E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पाकिस्तानातून उद्योजकाकडे पाच कोटींच्या खंडणीची मागणी
Wrutuja pandharpure
11 Apr 2025
पुणे
: पाकिस्तानातून मोबाईलवर संपर्क साधून पुण्यातील उद्योगपतीला पाच कोटींच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली. व्हॉईसनोट तसेच व्हॉट्सअॅप कॉलद्वारे ही खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी तरुण उद्योजकाने दिलेल्या तक्रारीवरून कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार हे कोरेगाव पार्क परिसरातील बोट क्लब रस्ता येथे राहण्यास आहेत. त्यांची स्वतःची खासगी विमान कंपनी (एव्हिएशन) आहे. या कंपनीकडून हेलिकॉप्टर, तसेच विमाने भाडेतत्त्वावर वापरण्यास दिली जातात. तक्रारदार यांचा हा व्यवसाय भारतासह दुबई आणि इंग्लंड या देशामध्येही सुरू आहे.
तक्रारदार यांना २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मोबाईलवर एका क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. मोबाईल क्रमांक पाकिस्तान येथील असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर, त्याच क्रमांकावरून पहिली व्हॉईसनोट तक्रारदार यांना प्राप्त झाली.
त्यांनी ती सुरूवातीला पाहिली नाही. त्यानंतर, काही वेळाने पुन्हा मेसेज आला़ ‘तू एका एव्हीएशन कंपनीचा मालक आहेस ना? नवीन हेलिकॉप्टर खरेदी करत आहेस ना?. हेलिकॉप्टर खरेदी करण्यापूर्वी काही रकम द्यावी लागेल.’ असे त्या संदेशात म्हटले होते. त्यानंतर उद्योजकाला पुन्हा एक संदेश पाठविण्यात आला. ‘तुझी संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. पाच कोटी तयार ठेव. ही गोष्ट मजेत घेऊ नकोस, खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’, असे संदेशात म्हटले होते.
तक्रारदार यांना अशा आशयाचा व्हॉईसनोट आल्यानंतर, सुरूवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर, २८ फेब्रुवारीला पुन्हा व्हॉट्सअॅप वर मेसेज आला. पाठोपाठ व्हाईस नोट आली. त्यात अर्वाच्य शिवीगाळ करुन गोळी मारली जाईल, असे म्हटले. दोन-दोन हेलिकॉप्टर घेण्यासाठी पैसे नाहीत, असे त्या व्हॉईस नोटमध्ये लिहिले होते. त्यानंतर १६ मार्च रोजी पुन्हा व्हॉईस नोटवरुन पाच कोटींची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर, तक्रारदार यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. कोरेगाव पार्क पोलिस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, उद्योजकाला धमकाविण्यासाठी ज्या क्रमांकाचा वापर करण्यात आला आहे. तो क्रमांक पाकिस्तानातील आहे. खंडणीखोराने ‘प्रॉक्झी सर्व्हर’चा वापर करुन उद्योजकाला धमकाविल्याचा संशय आहे. गुन्हे शाखा, तसेच सायबर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Related
Articles
लेझरच्या वापराने क्षेपणास्र नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित
14 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
वाहनांना उडवले; चौघांना चिरडले
17 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
असा बालीशपणा उद्धवच करु शकतात!
17 Apr 2025
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
लेझरच्या वापराने क्षेपणास्र नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित
14 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
वाहनांना उडवले; चौघांना चिरडले
17 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
असा बालीशपणा उद्धवच करु शकतात!
17 Apr 2025
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
लेझरच्या वापराने क्षेपणास्र नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित
14 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
वाहनांना उडवले; चौघांना चिरडले
17 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
असा बालीशपणा उद्धवच करु शकतात!
17 Apr 2025
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
लेझरच्या वापराने क्षेपणास्र नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित
14 Apr 2025
भजन, कीर्तनात रमले भाविक
13 Apr 2025
वाहनांना उडवले; चौघांना चिरडले
17 Apr 2025
कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार
17 Apr 2025
असा बालीशपणा उद्धवच करु शकतात!
17 Apr 2025
मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक
15 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार